Connect with us

Uncensored मराठी

प्रारुप प्रभागांच्या रद्द झालेल्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने खर्च केले तब्बल २७.१० लाख रुपये

Avatar photo

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 7th May 2022

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेले भौगोलिक सीमा विभागणी राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. पण या प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एकूण २७.१० लाख  रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना निवडणूक कार्यालयाने दिली आहे.

अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  निवडणूक कार्यालयाकडे प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती मागितली असता निवडणूक कार्यालयाने गलगलींना प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एकूण २७.१० लाख रुपये खर्च केले असल्याचे कळवले. यात प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय यांना १९.८७ लाख रुपये इतक्या रक्कमेचे अधिदान करण्यात आले आहे. तसेच हरकती व सूचना या कार्यक्रमासाठी हॉलच्या भाड्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांना ३.९७ लाख देण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचारी यांच्या भोजनासाठी मेसर्स सेंट्रल कॅटरर्स यांस १.५३ लाख, व्हिडीओ शूटिंग, एलईडी स्क्रीन करिता आरंभ एंटरप्रायजेसला १.५२ लाख रुपये, स्टेशन करिता वसंत ट्रेडर्स यांना १८ हजार आणि मेसर्स विपुल यांस १८९ रुपये देण्यात आले आहे.

अनिल गलगली यांच्या मते नियोजन न करता केलेला खर्च वाया गेला कारण राज्य सरकारने सीमा रद्द केल्या आणि त्यामुळे मुंबईकरांच्या करातून जमा झालेल्या पैश्यांची उधळपट्टी झाली आहे.

Uncensored मराठी

जेव्हा दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका एकमेकांना भेटतात

Avatar photo

Published

on

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने घेतली सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट

एका पुरस्कार सोहळ्यात गायिका सावनी रविंद्रने सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर सावनीने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. सावनीच्या चाहत्यांनी ‘दोन‌ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका जेव्हा भेटतात’ अश्या कमेंट्स करून त्यांनी सावनीला खूप शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र या भेटी विषयी सांगतात, “माझ्यासाठी हा क्षण स्वप्नवत होता. कारण, आजपर्यंत लहानपणापासून श्रेयाजींची हजारो गाणी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. मला नेहमीच त्यांच्या विविध भाषेतील गाण्यांचं आकर्षण होतं. लता दीदींनंतर श्रेया घोषाल यांना मी माझा आदर्श मानत आले आहे. त्यांच्या हिंदी व्यतिरिक्त तेलुगू मल्याळम अश्या भारतीय भाषेतील गाण्यांची मी पारायणं केली आहेत. मी त्यांची गाणी ऐकून त्या भाषा शिकण्याचा आणि त्या भाषांमध्ये गाण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मला त्या एका भेटीत आठवल़ं की आपण त्यांची गाणी एका लूपवर खूप वेळा ऐकलीत आणि त्या खुद्द आपल्या समोर आहेत.”

पुढे सावनी सांगते, “मला भरून आलं जेव्हा त्या मला स्वतःहून म्हणाल्या, की येस, मी तुला ओळखते, तुला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हा मी तुला गुगल केलं. तिथे तुझ्याबद्दल संपूर्ण माहिती वाचली. तुझी गाणी ऐकली. तुला ज्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते गाणं खूप शोधलं. पण मला सापडलं नाही. तेव्हा मी म्हटलं तो सिनेमा अजून प्रदर्शित झालेला नाही. त्यावर त्या म्हणाल्या, तो सिनेमा लवकर प्रदर्शित करा. मी फार उत्सुक आहे ते गाणं ऐकण्यासाठी. तेव्हा मला आनंदाने गहिवरून आलं. श्रेया जी इतक्या मोठ्या गायिका आहेत. पण तरीही त्या फार प्रेमळ आहेत. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी आठवणीत राहणारा होता. माझ्यासाठी ती भेट म्हणजे फॅन मोमेंट होती.”

Continue Reading

Uncensored मराठी

Sri Lanka crisis – श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकट; आणि राष्ट्रध्यक्ष अज्ञातवासात

Avatar photo

Published

on

Kalyani Gilbile, 12th July 2022:

गंभीर आर्थिक संकटाच्या जाळ्यात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. गगनाला भिडलेली महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा यामुळे लाखों संख्येने लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहे. एवढेच, नव्हेतर शनिवारी असंख्य आक्रमक नागरिकांनी राष्ट्रध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानांच्या घरात घुसून ताबा मिळवला आणि पंतप्रधानाच्या शासकीय निवासस्थाला आग लावली.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यानी देश सोडून पलायन केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणांकडून अद्याप असा कोणताही खुलासा झालेला नाही आहे. राष्ट्रपती गोटाबाय यांनी अजूनतरी औपचारिकपणे राजीनामा दिला नसून ते अज्ञातवासात आहे, असे म्हटले जात आहे.   

श्रीलंकेची अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच झाली असून या देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे  तळागाळाला गेली आहे. श्रीलंकेतील सरकार जनतेच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकली नाही, असे दिसून येते. श्रीलंकेची अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे, परंतु करोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन जवळजवळ ठप्प होते. तसेच, गेल्या वर्षी राजपक्षे सरकारने पूर्णपणे जैविक शेती करण्याचे जाहीर करून कोणतीही पूर्वतयारी न करता सर्वप्रकारचा शेतीमाल आयात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे देशातील कृषी उत्पादनांवर वाईट परिणाम झाला आणि अपुऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामुळे प्रचंड महागाई वाढून साठेबाजीला सुरुवात झाली. आणि साठेबाजीला नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने आणीबाणी जाहिर करून जनतेचा रोष अंगावर ओढून घेतला.         

Continue Reading

Uncensored मराठी

मुंबई आणि गोव्यात दोन जणांची दगडाने हत्या केल्याप्रकरणी कचरा वेचकाला पोलिसांकडून अटक

Avatar photo

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 7th June 2022

मुंबई आणि गोवा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दगडांनी डोके फोडून दोन पुरुषांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका 23 वर्षीय कचरा वेचणाऱ्या युवकाला सोमवारी अटक करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

डीबी मार्ग पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सूरज रामसेवक यादव याने 21 जूनच्या पहाटे गिरगाव चौपाटीजवळ अचानक झालेल्या वादानंतर गजानन रामचंद्र पवार (55) नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे. 

“आम्हाला वांद्रे येथे यादवचे सीसीटीव्ही फुटेज सापडले एका स्वयंसेवी संस्थेने बेघरांना मोफत जेवण दिल्याच्या ठिकाणी तो पोहोचला तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने पवारांची हत्या केल्याची कबुली दिली आणि गोव्यात एका व्यक्तीची दगड ठेचून हत्या केल्याचेही कबूल केले,” असे अधिकारी म्हणाले.

Continue Reading

Trending